विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सागर साळुंके; मराठवाड्याला प्रथमच मोठा सन्मान

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद) दि २३ जुलै :- छत्रपती संभाजीनगरचे सागर कैलास साळुंके यांची नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI - विद्यार्थी काँग्रेस) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्याला या पदाचा मान प्रथमच प्राप्त झाला आहे.
सागर साळुंके यांच्या विविध विद्यार्थी चळवळीतल्या सक्रिय सहभागाची दखल घेत, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी व प्रभारी कन्या कुमार यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या या नेमणुकीसाठी राज्य प्रभारी अर्जुन चपराणा आणि अक्षय यादव यांनी शिफारस केली होती.
साळुंके यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विद्यार्थी प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज उठवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
🗞️ मराठवाड्याच्या नेतृत्वाला मिळालेल्या या संधीमुळे नव्या आशा निर्माण झाल्या आहेत – ही सुरुवात नक्कीच वेगळी ठरणार
!