"विकास कामांचा दर्जा ठेवा, निधी वेळेत खर्च करा" — अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २ जुलै :- राज्यात पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत असून, ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत होणारी कामे उच्च दर्जाची असावीत. निधी वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय ठेवावा आणि चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी तो पूर्णतः खर्च व्हावा, याची दक्षता घ्यावी.
राज्याच्या प्रगतीसाठी केंद्राकडून मिळणारा प्रत्येक रुपया अत्यंत मोलाचा असून, तो परत जाऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
"विकासाची गती कायम ठेवायची असेल, तर प्रत्येक निधीचा योग्य वापर अनिवार्य आहे!"