राष्ट्रवादीच्या नेतृत्वात दोन वर्षांचा यशस्वी प्रवास – अभिजीत भैय्या देशमुख यांच्या सन्मानाचा सोहळा उत्साहात

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (दि. २६ जुलै) –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हाध्यक्ष पदाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणारे मा. श्री. अभिजीत भैय्या देशमुख यांचा गौरव सोहळा आणि ‘निर्धार परिवर्तनाचा’ कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष श्री. शेख कय्यूम, माजी अध्यक्ष श्री. नागेश भालेराव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष श्री. असद पटेल, नगरसेविका सौ. अंकिताताई विधाते, माजी महिला अध्यक्ष सौ. कविताताई शिंदे, पांडुरंग कसबे, हितेश चव्हाण, जाफर पठाण, वार्ड अध्यक्ष इम्रान शेख, विशाल शेजवळ, दिलीप हिवाळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मा. अभिजीत भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या संघटनात्मक बळकटीकरणाचा आढावा घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांत पक्षसंघटनेची धुरा खांद्यावर घेत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून पक्षवाढीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
या संवाद मेळाव्यात “परिवर्तनाचा निर्धार” या संकल्पनेवर आधारित आगामी राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पक्षाच्या संघटनात्मक दृढतेचा पुरावा ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – पश्चिम शहर अध्यक्ष मा. विनोद जाधव यांनी केले होते. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानत पक्षबळ वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.
🔹 “कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नेतृत्त्वाचा निर्धार – हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशाचा मूलमंत्र!”