"मोर्चाला आमचा कोणताही आक्षेप नाही; आम्ही काम करणारे, ते फक्त एक्टिंग करणारे!" – एकनाथ शिंदेंचा टोला

"मोर्चाला आमचा कोणताही आक्षेप नाही; आम्ही काम करणारे, ते फक्त एक्टिंग करणारे!" – एकनाथ शिंदेंचा टोला

महाराष्ट्र वाणी न्युज 

नागपुर २९ जून :– "लोकशाहीत मोर्चा काढणं हा सर्वांचा अधिकार आहे. आम्हाला त्याला कोणताही आक्षेप नाही," असं स्पष्ट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार शब्दात हल्ला चढवला. "त्यांना एक्टिंग येतं, आम्ही फिल्डवर काम करतो. नक्कल करता येते पण त्याला अक्कल लागते," असा घणाघात करत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

‘हिंदी सक्ती’ प्रकरणावर पलटवार

शिंदेंनी स्पष्ट केलं की, "महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर समितीचा हिंदी अनिवार्य करण्याचा अहवाल कोणी स्वीकारला? तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मान्य केला होता. सत्तेत असताना वेगळी भूमिका आणि सत्तेतून बाहेर पडल्यानंतर वेगळी – ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्र जनतेला ठाऊक आहे."

"संपलेला पक्ष" म्हणणारे आज युती मागतात!

"ज्यांना तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होतात, त्यांच्याशीच आज युती मागण्याची वेळ का आली? याचा आत्मपरीक्षण करा," असा सल्लाही त्यांनी दिला. शिंदेंनी ठामपणे सांगितलं की, “आमच्या सरकारने ‘हिंदी सक्ती’ नाही, तर ‘मराठी हित’ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. 'अनिवार्य' हा शब्द आम्ही पहिल्याच दिवशी हटवला होता."

"लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क आहे"

शिंदेंनी मोर्चा काढणाऱ्यांच्या अधिकाराची कबुली देताना, महाविकास आघाडीवर जुन्या निर्णयांची आठवण करून दिली – "२०१९ मध्ये जनतेने ज्या पक्षाला मतदान केलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत सरकार स्थापलं. हेही महाराष्ट्राने पाहिलं आहे."

राज ठाकरेंबाबतही स्पष्ट भूमिका

"शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मीही त्यांच्याशी बोलेन. यात काही कमीपणा नाही. यापूर्वीही आमच्यात भेटीगाठी झालेल्या आहेत," असं सांगत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संवादाचे संकेत दिले.

 "जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला जातो, अभिनयासाठी नाही!" – वाचा पुढील अपडेटसाठी...