मुस्लिम तरुण सुलेमानचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू, एकता संघटनेचा तीव्र विरोध — प्रशासन व नेत्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह

मुस्लिम तरुण सुलेमानचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू, एकता संघटनेचा तीव्र विरोध — प्रशासन व नेत्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह
मुस्लिम तरुण सुलेमानचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू, एकता संघटनेचा तीव्र विरोध — प्रशासन व नेत्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव दि१४ :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसीलमधील बेटावद गावात २१ वर्षीय मुस्लिम तरुण सुलेमान पठाण याचा मॉब लिंचिंगच्या अमानुष घटनेत मृत्यू झाला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, घटनेच्या पद्धतीने परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.

नेत्यांचे मौन — नागरिकांचा आक्रोश

घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी गावाचे पोलीस पाटील, सरपंच आणि या भागाचे आमदार व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाला भेट दिलेली नाही. तसेच आरोपींवर कठोर कारवाई होईल, असे कोणतेही ठोस विधानही करण्यात आलेले नाही.

यावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

"राजकारणी निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या दारात पोहोचतात, पण अशा वेळी मात्र मौन बाळगतात," असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

एकता संघटनेची गावभेट — “हम आपके साथ हैं”

एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी बेटावद गावाला भेट दिली.

पीडित कुटुंबाशी दोन तास संवाद

सांत्वन व धीर देण्याचा प्रयत्न

सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

या वेळी मौलाना ओसामा फलाही यांनी कुराणातील संयमाचा संदेश दिला व धार्मिक सौहार्दाची गरज अधोरेखित केली.

> फारुख शेख म्हणाले:

"अरेरे… माणुसकीही जिवंत नाहीये. महाराष्ट्रात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे"

प्रशासनाकडे मागण्या

एकता संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत:

1. सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई.

2. पीडित कुटुंबाला आर्थिक व कायदेशीर मदत.

3. गावात व परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांची सतत गस्त.

4. अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन योजना

शांततेचे आवाहन

संघटनेने नागरिकांना "शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द राखण्याचे" तसेच "द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना विरोध करण्याचे" आवाहन केले आहे.

शिष्टमंडळातील उपस्थिती

फारुख शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना ओसामा फलाही, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगार, कासिम उमर, अतीक अहमद, आरिफ अजमल (सर्व जळगाव एकता संघटना), कुर्बान शेख (फैजपूर), इरफान शेठ (चीनावल), अजगर शेख (सावदा), जावेद जनाब (मारुळ) तसेच जावेद मुल्लाजी, अशफाक पटेल, आसिफ शेख, जुबेर शेख, शकील मुसा, उमर सय्यद (जामनेर) आदी उपस्थित होते.

फारुख शेख मृत सुलेमानचे वडील रहीम खान व आजोबा बनेखा पठाण यांचे सांत्वन करताना, सोबत संघटनेचे पदाधिकारी.

 मृताच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश.