मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिलांच्या सक्षमीकरणाची ‘सन्मान वाटचाल’ पुन्हा सुरू! उद्यापासून ऑक्टोबर महिन्याचा निधी वितरणाला सुरुवात
महाराष्ट्र वाणी 🗞️
मुंबई दि ३ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली महिला सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. या वाटचालीला अधिक बळ मिळावे म्हणून शासनाने योजनेच्या संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in ही E-KYC सुविधा सुरू केली आहे.
प्रत्येक लाभार्थी महिलेनं १८ नोव्हेंबरपूर्वी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अशी प्रशासनाकडून नम्र विनंती करण्यात आली आहे.
🔸 "लाडकी बहीण" योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाला आणि स्वावलंबनाला नवा आधार मिळत आहे!
(महाराष्ट्र वाणी – सक्षमीकरणाच्या प्रत्येक पावलाची नोंद!)