मीडियावरील खोट्या केसेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पोलिस महासंचालकांना निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १ ऑगस्ट :– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, सत्ताधारी पक्षाकडून सोशल मीडियावरील कार्यकर्त्यांवर खोट्या केसेसचा होणारा दबाव रोखण्यासाठी आज पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांची भेट घेण्यात आली.
यावेळी सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे उपस्थित होते. कार्यकर्त्यांना छळासारख्या कारवायांपासून संरक्षण मिळावे, तसेच भविष्यात पुन्हा असे प्रकार घडल्यास कडक भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
🟠 "सामाजिक माध्यमांवरील सक्रिय कार्यकर्त्यांना गप्प बसवण्यासाठी सुरू असलेला हा दबावशाहीचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही," असे मत पक्षाकडून व्यक्त करण्यात आले.
👉 "आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तरी आवाज दुणावल्याशिवाय राहणार नाही!"