माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त लोहारा येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र वाणी न्युज 

लोहारा (ता. बाळापुर)दि १४ :- स्वातंत्र्य दिनानिमित्त लोहारा येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनविकास फाउंडेशन संचलित सेवार्थ दवाखाना आणि जीवन केअर क्लिनिक यांच्या वतीने, माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेगाव यांच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे.

हा उपक्रम जीवन केअर क्लिनिक च्या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. जामा मशीदच्या बाजूला, ग्रामपंचायत रोड, लोहारा येथे सकाळी 10 वाजता पासुन या शिबिरात दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिकांना मोफत तपासणी व औषध वितरणाची सुविधा दिली जाणार आहे.

शिबिरात उच्च रक्तदाब (हाय बीपी), हृदयाचे व फुफ्फुसांचे आजार, दमा, मधुमेह (डायबिटीस), संधिवात, मेंदू विकार, पॅरालिसिस, टायफॉईड, व्हायरल, डेंग्यू, मलेरिया ताप, गॅस्ट्रो, तसेच लहान मुलांचे व महिलांचे आजार यांची तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातील.

“ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे,” असे जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जमील देशमुख यांनी सांगितले. यावेळी डॉ. शेख अफरोज (संस्थापक ट्रस्टी व संचालक, जीवन केअर क्लिनिक), साबीर मिर्झा, मौलवी वसीम पटेल, जाकीर हुसेन गुलाम दस्तगीर (संस्थापक ट्रस्टी) उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7773954777