मनपा निवडणूक: इच्छूकांसाठी खुशखबर! ११ नोव्हेंबरला ‘लकी ड्रॉ’, आरक्षणाची सोडत होणार
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ :
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छूक उमेदवारांसाठी मंगळवार हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत (लकी ड्रॉ) काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे.
या सोडतीत विविध प्रवर्गांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे —
🔸 ओबीसी प्रवर्गासाठी ३१ जागा, त्यापैकी १६ महिला आरक्षित
🔸 एसटी प्रवर्गासाठी २ जागा, त्यापैकी १ महिला आरक्षित
🔸 एससी प्रवर्गासाठी २२ जागा, त्यापैकी ११ महिला आरक्षित
🔸 सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ३० जागा आरक्षित
या आरक्षण सोडतीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सोडतीनंतर मनपा निवडणुकीची दिशा व संभाव्य राजकीय समीकरणांबाबतची उत्सुकता अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
राजकारण तापणार, आणि इच्छुकांची धडपड सुरू होणार – मंगळवार ठरेल निर्णायक! 🗳️