बनावट आधारवर फुकट प्रवास? आता थेट ७/१२ वर बोजा! एसटीच्या तपासणीत अनेकांचे धाबे दणाणले!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जुलै :- एसटी महामंडळाच्या १५ ते १८ जुलैदरम्यान राबवलेल्या विशेष मार्ग तपासणी मोहिमेत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ, दिव्यांग आणि विद्यार्थी पासधारक प्रवाशांची झालेली तपासणी ही एकप्रकारे बनावट दस्तऐवज वापरणाऱ्यांसाठी चटका देणारी ठरली.
या मोहिमेत अनेकांनी बनावट आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र वापरून प्रवास केल्याचे समोर आले. विशेष बाब म्हणजे, योजनेचा गैरफायदा घेत प्रवास करणाऱ्यांमध्ये 'ज्येष्ठ' आणि 'अमृत ज्येष्ठ' योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
🆔 ‘बनावट’ ओळख सापडली तर सरळ दंड थेट जमिनीवर!
तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, बनावट आधार सापडल्यास प्रवाशाने योजनेंतर्गत आतापर्यंत केलेल्या सर्व प्रवासाचा खर्च ७/१२ उताऱ्यावर म्हणजेच जमिनीवर वसूल केला जाईल. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
👥 अचानक घटली ज्येष्ठांची गर्दी
या कारवाईच्या भीतीमुळे "अमृत ज्येष्ठ" आणि "ज्येष्ठ नागरिक" पासधारकांची संख्या एकदम घटली. काहींनी तर प्रवास अर्ध्यावरच थांबवला, तर काहींनी दुसऱ्या दिवसापासून प्रवास टाळणे पसंत केले.
🛂 आता होणार सरकारकडून थेट स्कॅनिंग!
एसटी प्रशासनाने ठाम निर्णय घेतला आहे की, येथून पुढे आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्राची सरकारकडून थेट स्कॅनिंग करून खातरजमा केली जाईल. बनावट आढळल्यास पूर्वीच्या सर्व प्रवासाचा खर्चही वसूल केला जाणार आहे.
🗣️ बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एसटी महामंडळाचा हा पाऊल निर्णायक ठरणार आहे!
अशीच बातमी हवी असेल, वाचा आणि शेअर करा! 👇