“प्रभाग-१९ हाक देतोय… आपलाच नगरसेवक हवा!” – Adv. हर्षवर्धन त्रिभुवन मैदानात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- महानगरपालिका प्रभाग-१९ मधून Adv. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. कायदेविषयक सखोल अभ्यास, सामाजिक बांधिलकी आणि स्थानिक पातळीवरील घट्ट नातेसंबंध यांच्या बळावर प्रभागातील प्रश्नांना न्याय देण्याचा त्यांचा निर्धार आहे.
Adv. हर्षवर्धन त्रिभुवन यांचे या प्रभागाशी नाते केवळ राजकीय नसून ते जिव्हाळ्याचे आहे. त्यांची सासुरवाडी भीमपुरा येथे असून, श्री गुरु तेग बहादूर इंग्लिश स्कूल—जिथे त्यांनी शिक्षण घेतले—हेही याच प्रभागात आहे. त्यामुळे बालपणापासून ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रभाग-१९ शी घट्ट जोडलेला आहे.
रमानगर परिसरात त्यांचे नातेवाईक तसेच मोठा मित्रपरिवार आहे. यासोबतच क्रांतीचौक, ज्योतीनगर, प्रतापनगर, चौसरनगर, शहा कॉलनी आदी भागांमध्येही त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे. विविध वयोगटांतील नागरिकांशी असलेले हे नाते त्यांच्या कामकाजाची दिशा ठरवणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रभागातील नागरी समस्या—रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, युवकांसाठी संधी आणि महिलांच्या सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांवर ठोस, कायदेशीरदृष्ट्या सक्षम आणि लोकाभिमुख उपाययोजना राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. “प्रभाग-१९ मधील नागरिकांना अपेक्षित असलेला नगरसेवक बनून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे Adv. त्रिभुवन यांनी सांगितले.
तरुण नेतृत्व, अभ्यासू दृष्टीकोन आणि सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेले Adv. हर्षवर्धन त्रिभुवन प्रभाग-१९ मध्ये नवे पर्व घडवतील, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे
कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व हवे असेल, तर प्रभाग-१९ मध्ये बदलाची हीच वेळ आहे!