प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे दोघे जेरबंद; ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि २ जुलै :– गुन्हे शाखेच्या पथकाने समृद्धी महामार्गावरील माळीवाडा परिसरात केलेल्या कारवाईत ८३ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे इसम आणि वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई २१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार समृद्धी जंक्शनजवळ करोडी टोलनाका परिसरात संशयास्पद आयशर टेम्पो (क्र. DD 01 G 9092) थांबवण्यात आला. वाहनचालकाने आपले नाव बनसिंग बाबुलाल कटारिया (वय ३७, रा. बडागाव, ता. नलखेडा, जि. अगर मालवा, म. प्र.) असे सांगितले.
वाहन तपासणीदरम्यान त्यामध्ये ७५ गोण्या 'बाजीराव' सुगंधित पानमसाला गुटखा (किंमत ₹५६.२५ लाख) आणि 'मस्तानी' जर्दा (किंमत ₹६.७५ लाख) आढळून आले. याशिवाय, गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पो (अंदाजे किंमत ₹२० लाख) असा एकूण ₹८३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १२१/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १२३, १२४, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), व मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोउपनि. नवनाथ पाटवदकर, पोह. सतीश हंबर्डे, पोअं. संतोष भानुसे, शैलेश आस्कर, यशवंत गोबाडे आणि अन्न व सुरक्षा अधिकारी यांनी केली.
गुटखा माफियांवर पोलिसांचा हेरगिरीचा घाव — आणखी धाडसी कारवाया होण्याची शक्यता!