नितीन शेजवळ यांची मराठवाडा उद्योजक व व्यापार विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे ( छत्रपती संभाजीनगर) दि२८ जून :– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तसेच उद्योजक व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. नागेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील भूमिपुत्र मा. नितीन शेजवळ यांची उद्योजक व व्यापार विभागाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नागेश पाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शेजवळ यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
मराठवाड्यातील उद्योजकांसाठी ही निवड नव्या संधींचे दार उघडणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेवटी एकच —
“नव्या जबाबदारीसह नवा आत्मविश्वास... मराठवाड्याचा विकास हेच ध्येय!”