नवीन नेत्रालयाची सुरुवात! डॉ. अमरीन देशमुख यांच्या ओपीडीचे उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते

डॉ. अमरीन देशमुख यांनी ही सेवा आता स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी N-12 मध्येही सुरु केली आहे.

नवीन नेत्रालयाची सुरुवात! डॉ. अमरीन देशमुख यांच्या ओपीडीचे उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते
नवीन नेत्रालयाची सुरुवात! डॉ. अमरीन देशमुख यांच्या ओपीडीचे उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ जुलै :– नेत्र आरोग्य क्षेत्रात सातत्याने सेवा देणाऱ्या डॉ. अमरीन देशमुख यांच्या नवीन ओपीडी शाखेचे उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील N-12 परिसरात संपन्न झाले.

या उद्घाटन समारंभाला बदनापूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अजहर अहमद सिद्दिकी, तसेच नासेर सिद्दिकी, मुकिम देशमुख, डॉ. शोएब हाश्मी, डॉ. फैसल सय्यद, डॉ. निसार अहमद देशमुख, चांद पटेल, डॉ. हाफिज देशमुख आणि डॉ. राज मोहम्मद यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात आणि ग्रामीण भागातून डोळ्यांच्या आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, या उद्देशाने ही नवीन ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांचा विश्वास संपादन करणाऱ्या डॉ. अमरीन देशमुख यांनी ही सेवा आता स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी N-12 मध्येही सुरु केली आहे.

या वेळी बोलताना डॉ. अमरीन देशमुख म्हणाल्या की, "बाहेरून येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून हे नव्या ओपीडी सेंटरची सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी डोळ्यांसंबंधी कोणतीही समस्या असल्यास संपर्क साधावा."

👉 विश्वासाची नवी दारे उघडलीत… आता नेत्ररोग उपचारांची सोय तुमच्या जवळच!