नगरदेवळ्यात विज्ञान-गणित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

नगरदेवळ्यात विज्ञान-गणित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!
नगरदेवळ्यात विज्ञान-गणित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

महाराष्ट्र वाणी 

नगरदेवळा (ता. पाचोरा, जळगाव) दि १ :- सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील उर्दू विभागाच्या वतीने आयोजित विज्ञान व गणित विषयाच्या शैक्षणिक साहित्य व प्रकल्प प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 29 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या प्रदर्शनात इयत्ता 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले तब्बल 40 हून अधिक प्रकल्प विशेष आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम शिक्षण समिती संचालित संस्थेचे मानद सचिव श्री. शिवनारायण जी जाधव यांनी फीत कापून केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प पाहून कौतुक केले आणि त्यांच्या सादरीकरणांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव श्री. बापूसाहेब शिवनारायण जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक दादासाहेब अब्दुल गनी सेठ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण काटकर, उपमुख्याध्यापक गहरवाल सर, तसेच विविध विभागांचे प्रमुख शिक्षक, पालक व ग्रामस्थ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याध्यापक किरण काटकर सरांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दादासाहेब अब्दुल गनी सेठ यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत प्रोत्साहनपर संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल शेख सर यांनी केले, तर प्रास्ताविक सादीक शेख सर यांनी केले. कलीम शेख सर यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी दादासाहेब अब्दुल गनी सेठ, प्राध्यापक उमेश काटकर सर आणि उर्दू विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

नगरदेवळ्यातील या विज्ञानोत्सवाने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवा उजाळा दिला!