दादारावजी गोडसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सिल्लोड युवक कार्याध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड दि २० :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस गती देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील युवक कार्याध्यक्षपदी दादारावजी गोडसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या युवकांच्या संघटनेला नवे बळ मिळणार असून, गोडसे पाटील यांच्या नेतृत्वातून युवकांना योग्य दिशा मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी दादारावजी गोडसे पाटील यांना निवडीचं पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव, ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील कळम उपस्थित होते.
तसेच अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक, तालुका अध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे, शहराध्यक्ष शेख शाकीर, श्री. अजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष असलम बागवान, अजहर दादा, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष शाकीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे सिल्लोड तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
✍️ अधिक अपडेट्ससाठी वाचा – महाराष्ट्र वाणी