दहावीत १०० टक्के गुण; शोएब आतार यांचे ऐतिहासिक यश, बीड जिल्ह्याचा वाढवला मान!
महाराष्ट्र वाणी
बीड दि ९ :- जिल्ह्यातील शौकत आतार सर यांचे चिरंजीव शोएब आतार यांनी दहावी बोर्ड परीक्षेत तब्बल १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आतार परिवारासह संपूर्ण शिरूरकासार तालुका आणि बीड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. 💐
शोएब यांनी आपल्या बुद्धिमत्ता, अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे उज्ज्वल यश मिळवले आहे. आजच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरणारे आहे.
आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांचा सुंदर संगम म्हणजे शोएब यांचे हे अभूतपूर्व यश होय.
शोएब आतार यांचे महाराष्ट्र वाणी परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. भविष्यातही त्यांनी अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच सदिच्छा. 💐
“यश मेहनतीचेच असते; शोएब आतार यांनी ते पुन्हा सिद्ध करून दाखवले!”