छावणी परिषद शाळेत मनपा च्या वतीने शालेय पोषण आहार सुरू – आयुक्तांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खिचडी व गोड पदार्थाचे वाटप
ही शाळा छावणी नगर परिषद ची होती परंतु या शाळेस शालेय पोषण आहार मिळत नव्हता
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि १४ जुलै :- छावणी नगर परिषद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये विलीनीकरण होण्याची प्रकिया सुरू आहे. या प्रक्रियेला वेळ लागेल परंतु छावणी नगर परिषद ची सुरू असलेल्या एका शाळे मध्ये मा. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी लगेच आज पासून शालेय पोषण आहार वितरण करण्यास सुरुवात केली आहे.
ही शाळा छावणी नगर परिषद ची होती परंतु या शाळेस शालेय पोषण आहार मिळत नव्हता म्हणून छावणी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होत्या. छावणी चे महानगरपालिका मध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच मनपा च्या वतीने शालेय पोषण आहाराची स्वतः आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना खिचडी व मिठाई देऊन सुरुवात केली. यावेळी छावणी नगर परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी उपस्थित होत्या.
तसेच शाळेसाठी डिजिटल बोर्ड आणि व्हाईट बोर्ड व वॉटर फिल्टर ची आवश्यकता असल्याचे सांगितले असता आयुक्त तथा प्रशासक यांनी उप आयुक्त अंकुश पांढरे यांना याबाबत निर्देश दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठी स्वप्ने पाहिले पाहिजेत. मनपाच्या शाळेसोबतच या शाळेचाही स्मार्ट शाळा करण्याबरोबरच बेस्ट शाळा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
या प्रसंगी छावणी परिषदेचे नामनिर्देशित सदस्य प्रशांत तारगे ,मनपाचे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे ,नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे ,छावणी अधीक्षक वैशाली केनेकर,विस्तार अधिकारी रामनाथ थोरे,कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे,अण्णामृत फाउंडेशन चे प्रमुख पोटभरे, तसेच मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ननावरे व प्रियंका तारगे आणि पालक व विद्यार्थी उपस्थित होते.