कोकनवाडी चौक ते देवगिरी कॉलेज रोडवर 17 दुकाने निष्कसित
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- दिनांक 10 डिसेंम्बर रोजी कोकनवाडी चौक ते देवगिरी कॉलेज रोडवर अतिक्रमण विभागाने कारवाई करत एकूण 17 दुकाने निष्कसित केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशनव्य आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणवाडी चौक ते देवगिरी कॉलेज रोडवरील जैस्वाल भवन समोरील व लगत असलेली रस्त्यावरील एकूण 17 दुकानांचे अतिक्रमण हटवून सदर रस्ता मोकळा करण्यात आला. सदर अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता.
सदरील कारवाईत वाहूळे, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ व नागरी मित्र पथक कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.