कुरेशी समाजाच्या मागण्यांसाठी जिल्हानिहाय शिष्टमंडळ सक्रिय, शिर्डीत बच्चू कडूंना दिले निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
शिर्डी दि. ०२ ऑगस्ट :- राज्यातील विविध जिल्ह्यांतील कुरेशी समाजाचे शिष्टमंडळ सध्या समाजाच्या न्यायहक्कासाठी एकवटले असून, विविध पातळीवर नेत्यांना भेटून आपली मागणी समजावून सांगत आहेत. समाजाचा सध्या सुरू असलेला बेमुदत बंद नेमका का आहे, याची माहिती संबंधित नेत्यांना देण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज शिर्डी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू भाऊ कडू यांना समाजातील प्रतिनिधींनी भेट दिली. यामध्ये जावेद कुरैशी, रफीक कुरैशी, नादेर कुरैशी, सिराज कुरैशी यांच्यासह इतर सदस्य सहभागी होते.
शिष्टमंडळाने समाजाच्या प्रलंबित मागण्या मांडत या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्या, तसेच प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचला, अशी विनंती बच्चू कडूंना केली.
राज्यात अनेक भागांतून कुरेशी समाज एकत्र येत असून, आपापल्या जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत आवाज पोहोचवण्याचे काम जोरात सुरू आहे.
🟠 समाजाच्या हक्कासाठी एकत्र आलेली ताकद – लवकरच काहीतरी ठोस घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
.्