कु. रुतुजा खी. खिल्लारे यांची युवती शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती; आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत कु. रुतुजा खी. खिल्लारे यांची युवती शहर जिल्हाध्यक्ष (छत्रपती संभाजीनगर) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
ही नियुक्ती पक्षाच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रियाताई सुळे, फ्रंटल सेल अध्यक्ष रोहितदादा पवार, तसेच युवती प्रदेशाध्यक्ष यांच्या मान्यतेने व प्रदेशाध्यक्ष मनाली भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कु. रुतुजा खिल्लारे या युवती संघटनेच्या कार्यात सातत्याने सक्रिय असून, सामाजिक प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, कु. रुतुजा खिल्लारे या पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे व कार्यतत्परतेने काम करतील, असा पक्ष नेतृत्वाला ठाम विश्वास आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष व युवती संघटनेच्या राष्ट्रीय निमंत्रक महासचिव सुप्रिया ताई सुळे यांचे विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास त्या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कु. रुतुजा खिल्लारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे नियुक्तीपत्र मराठवाडा अध्यक्ष धनश्री तडवळकर यांच्या वतीने देण्यात आले आहे.
— युवती संघटनेला बळ देणारी ही नियुक्ती छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे.