काँग्रेसला अखेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष! किरण पाटील डोणगांवकर यांच्याकडे संघटनेची धुरा

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० जुलै : –
काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदासाठी अखेर नव्या नावाची घोषणा झाली असून, पक्षाशी निष्ठावान आणि उत्साही कार्यकर्ते किरण पाटील डोणगांवकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने ही नियुक्ती जाहीर करताच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून निवड झाल्यानंतर ते संसदीय कामात व्यस्त झाल्याने जिल्हा संघटनेच्या कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या कालावधीत ग्रामीण संघटन थोडक्यात मागे पडले होते.
आता डोळ्यासमोर असलेल्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. किरण पाटील डोणगांवकर हे युवा नेतृत्व असून, त्यांनी पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचे पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शहराध्यक्ष पदासाठीही चर्चा सुरू असून, लवकरच त्या नावाचीही घोषणा होणार असल्याचे संकेत पक्ष सूत्रांनी दिले आहेत.
🔸 युवा नेतृत्वाच्या नव्या दमावर काँग्रेस संघटना नव्या उमेदीने उभी राहणार का, हे पाहणे रंजक ठरेल!