काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्या; किरण पाटील डोणगांवकर यांच्या हस्ते तालुकाध्यक्षांना नियुक्तीपत्र वितरण
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद)दि १५ : – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नवी संघटनात्मक फेररचना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर यांच्या हस्ते गंगापूर, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि वैजापूर तालुकाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम आज गांधी भवन येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांनी नव्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर सज्ज नेतृत्व तयार करण्यात आले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवावी.”
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक जगन्नाथ काळे, प्रदेश सचिव अशोकराव डोळस, मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप, फुलंब्रीचे मावळते तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सुदामराव मते, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, जिल्हा सरचिटणीस राहुल सावंत, माजी तालुकाध्यक्ष संतोष शेजूळ, युवक माजी जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, बाळूशेठ गुजर, पप्पूराज ठुबे यांसह जिल्हा काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरीय संघटन कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नव्या जबाबदाऱ्या, नवे संकल्प – काँग्रेसची संघटना आणखी मजबुत करण्याचा निर्धार. ✅