“कन्नडकरांनो, शिवसेनेलाच प्रचंड बहुमत द्या!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

“कन्नडकरांनो, शिवसेनेलाच प्रचंड बहुमत द्या!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
“कन्नडकरांनो, शिवसेनेलाच प्रचंड बहुमत द्या!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

 कन्नड, दि १ :- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे कन्नड येथे आयोजित विराट जनसभेत शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हाक दिली. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता कवडे यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिंदे म्हणाले, “कन्नड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे माझी लाडकी बहिण संजना जाधव आमदार आहे. आणि आता अनिता कवडे यांच्या रूपाने आणखी एक लाडकी बहिण तुमच्या सेवेत दाखल होत आहे. विधानसभा निवडणुकीत जसा करिष्मा घडवला, तसाच करिष्मा नगरपरिषदेतही घडवा.”

महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ‘लाडकी बहिण’, ‘लेक लाडकी लखपती’ योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, महिलांना एसटी प्रवासात ५०% सवलत यांसारख्या योजना राबवून राज्यात महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “फक्त ₹1500 देऊन थांबणार नाही; नगरविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणार आहोत,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कन्नडच्या विकासाची हमी देताना शिंदे म्हणाले, “उत्तम रस्ते, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना, क्रीडांगणे, मैदाने, अभ्यासिका हवी असतील तर शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत द्या. नगरविकास विभाग निधीची कमतरता ठेवणार नाही.”

या सभेला सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार संजना जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता कवडे, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी — तुमच्या हक्काच्या बातम्या, तुमच्या आवाजासह!