इंजिनिअर्सना मोठी संधी! महावितरणमध्ये ३०० पदांची भरती; पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ३० जून:- Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)मार्फत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक अशा एकूण ३०० पदांवर ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
भरतीचे ठिकाण: मुंबई
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (वितरण): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल): सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजीमधील पदवी
उपकार्यकारी अभियंता (वितरण/सिव्हिल): संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी
वरिष्ठ व्यवस्थापक/व्यवस्थापक: CA किंवा CMA फायनल पास
उपव्यवस्थापक: CA/CMA/M.Com.
वयोमर्यादा (पदांनुसार):
अतिरिक्त कार्यकारी अभियंता: ४० वर्षे
उपकार्यकारी अभियंता व उपव्यवस्थापक: ३५ वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक: ४० वर्षे
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹५०० + GST
राखीव प्रवर्ग (EWS सहित): ₹२५० + GST
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा व मुलाखत (Personal Interview) द्वारे करण्यात येणार आहे.
वेतनश्रेणी:
पदाचे नाव वेतनश्रेणी (रु.)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता 81,850 - 1,84,475
उपकार्यकारी अभियंता 73,580 - 1,66,555
वरिष्ठ व्यवस्थापक 97,220 - 2,09,445
व्यवस्थापक 75,890 - 1,68,865
उपव्यवस्थापक 54,505 - 1,37,995
🔗 महत्वाचे दुवे:
ऑनलाईन अर्ज लिंक: mahavitaran.in/recruitment-career-options
जाहिरात क्रमांक 1: Google Drive Link
जाहिरात क्रमांक 2: Google Drive Link
सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी गमावू नका – आजच अर्ज करा आणि उज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!