आदर्श शिक्षक रामदास वाघमारे यांचा शिक्षक दिनी विशेष सत्कार
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ :- महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास वाघमारे यांचा शिक्षक दिनानिमित्त ब्रिजवाडी येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत विशेष सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहशिक्षिका शोभा नवल, सदाशिव फुसे, दगडाबाई अंभोरे, आकस्मिता देशमुख आणि किरण भोळे यांनी वाघमारे सरांचा शॉल, पुष्पगुच्छ व अब्राहम लिंकन यांचे प्रेरणादायी पत्र फ्रेम स्वरूपात भेट देऊन सन्मान केला.
सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य आणि योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वाघमारे सरांनी समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दाखवून त्यांचे जीवन घडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
या सन्मानावेळी उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने वाघमारे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"समाजाला दिशा देणारा प्रत्येक शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा दीपस्तंभ असतो."