‘अमृत’ संस्थेतर्फे मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रशिक्षण वर्ग सुरु
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२३ :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने मोबाइल फिल्म-मेकिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरु झाला असून शनिवारी (दि.२०) हा वर्ग सुरु झाला
मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन काम करता यावे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मोबाईल वापरून चित्रीकरण करणे, प्रकाश योजना, चित्रचौकट, ध्वनी याबाबत मूलभूत माहिती, संकलन,कथा निवेदन, पटकथा लेखन, तसेच सोशल मीडियासाठी रील्स आणि शॉर्ट फिल्म्स तयार करणे याबाबत सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणासाठी नहुष बडगे आणि आश्लेष जामरे हे अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत.
कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पि को :४३१००९ संपर्क क्रमांक अक्षय लंबे-७३९१०६५४७५.