अनिस पटेल यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड; काँग्रेस नेत्यांकडून स्वागत
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ जुलै :– सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते अनिस इमाम पटेल यांची छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार इमरान प्रतापगढी, तसेच महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अहमद खान आणि प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या स्वाक्षरीने पत्राद्वारे करण्यात आली.
या नियुक्तीसाठी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ यांनी शिफारस केली होती. त्यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, राष्ट्रीय सचिव नासेर नजीर खान, सचिव शेख कैसर आजाद, सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, सचिव खालिद पठाण व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनिस पटेल यांच्या निवडीचे काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात अल्पसंख्यांक काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी अपडेट्ससाठी वाचा www.maharashtra vaani.com वर!