e-KYC दुरुस्तीसाठी एकदाच अंतिम संधी; ‘लाडकी बहीण’ लाभार्थींना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत

e-KYC दुरुस्तीसाठी एकदाच अंतिम संधी; ‘लाडकी बहीण’ लाभार्थींना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत

महाराष्ट्र वाणी 

मुंबई दि १३ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम व ग्रामीण भागातील असून e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शासनाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिलांचे सक्षमीकरण हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने लाभार्थींना e-KYC मधील चुका सुधारण्याची संधी देणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार, e-KYC प्रक्रियेत केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली असून, ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे. या कालावधीत लाभार्थींनी आपली e-KYC माहिती काळजीपूर्वक दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी पोर्टलवर स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अशा महिलांनाही योजनेचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

e-KYC प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

— लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, संधी गमावू नका!