६७ व्या पदवीदान सोहळ्यात आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची विद्यापीठाला सदिच्छा भेट; पदवीधरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

निवडणुकीतील सहकार्याबद्दल कुलगुरूंसह विद्यापीठातील मान्यवरांचे मानले आभार

६७ व्या पदवीदान सोहळ्यात आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची विद्यापीठाला सदिच्छा भेट; पदवीधरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
६७ व्या पदवीदान सोहळ्यात आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची विद्यापीठाला सदिच्छा भेट; पदवीधरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच विविध मान्यवर सदस्यांची भेट घेऊन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

या भेटीदरम्यान पदवीदान समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार डॉ. पाटील यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि शैक्षणिक यशाला सलाम करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यातील शुभेच्छा दिल्या.

यावेळी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, पदवीधर युवकांसमोरील आव्हाने, रोजगाराच्या संधी, प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न तसेच विद्यापीठाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्राधान्य!

मराठवाड्यातील पदवीधर, विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या न्याय्य मागण्या व समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यात येतील. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी संपादन केलेले ज्ञान, कौशल्य आणि कर्तृत्व समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी पडावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व पदवीधरांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.

या स्नेहपूर्ण भेटीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू आणि सर्व मान्यवरांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित