सुखना नदी पुनरुजीवनाला वेग : प्रशासकांची अचानक पाहणी; दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे आदेश

सुखना नदी पुनरुजीवनाला वेग : प्रशासकांची अचानक पाहणी; दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे आदेश
सुखना नदी पुनरुजीवनाला वेग : प्रशासकांची अचानक पाहणी; दूषित पाणी तातडीने थांबवण्याचे आदेश

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- शहरातील महत्त्वाकांक्षी सुखना नदी पुनरुजीवन प्रकल्पाची शनिवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कामाची माहिती घेतली आणि प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

मात्र, नदीत सतत येणाऱ्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कार्यकारी अभियंता (ड्रेनेज) यांना कडक निर्देश दिले.

“निव्वळ कालमर्यादेत नदीत जाणारे सांडपाणी पूर्णपणे थांबवा,” असा तातडीचा आदेश त्यांनी दिला.

पाहणीदरम्यान प्रशासकांनी नदीकाठी असलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. महिलांनी आणि पुरुषांनी चालू कामाबाबत समाधान व्यक्त केले.

नागरिकांच्या उत्साहात वाढ व्हावी म्हणून प्रशासकांनी स्वतः नदीकाठावर दगड बसवून श्रमदानही केले.

या वेळी विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली. उपस्थित नागरिकांमध्ये आत्माराम दहीहंडे पाटील, रेखाबाई जाधव, रामकुवर रवे, सुमनबाई घोडके इत्यादींचा सहभाग होता.

नदी पाहणी आटोपल्यानंतर प्रशासकांनी शनि आश्रम, चिकलठाणा येथील मंदिरालाही भेट दिली.