“सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य संघर्ष! अंभई गटातून हरिदास शेलारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन”

“सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य संघर्ष! अंभई गटातून हरिदास शेलारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन”
“सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य संघर्ष! अंभई गटातून हरिदास शेलारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन”

महाराष्ट्र वाणी 

अंभई, दि. २ :- अंभई जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे हरिदास शेलार हे निवडणूक लढवत असून, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे ते एक सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राजकारणासोबतच समाजकारणाची प्रबळ आवड असलेले हरिदास शेलार हे यापूर्वी बोजगाव जळकी घाट ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे.

सर्वधर्म समभाव मानणारे आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक असलेले हरिदास शेलार हे हिंदुत्वासोबतच अठरापगड जातींना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून परिसरात ओळखले जातात. गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असलेला हा शेतकरी नेता नेहमी जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा आहे.

“मोठ्या माणसांबरोबर बसतानाच नाही, तर गरिबांच्या पणतीत बसणारा, अर्ध्या रात्रीही कामासाठी धावून येणारा आणि विरोधकांनाही ‘राम राम’ घालणारा हा आपला माणूस आहे,” अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आज जिलाध्यक्ष तांगडे पाटील शेलार यांच्या प्रचारासाठी आले असता अंभई येथील कॉर्नर बैठकीत बोलत होते.

“केवळ बोलघेवडी आश्वासनं देणारा मी नाही, तर तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असा ठाम विश्वास यावेळी अंभई जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार हरिदास पाटील शेलार यांनी व्यक्त केला.

हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तसेच आदरणीय शरद पवार साहेब आणि रोहित दादा पवार यांची भक्कम ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

“तुमचा आशीर्वाद आणि माझी जिद्द याच्या जोरावर अंभई सर्कलमध्ये विकासाचं नवं पर्व नक्कीच सुरू होईल,” असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, सर्वसामान्यांशी नाळ जुळवून काम करणारे हरिदास पाटील शेलार हे अंभई सर्कलमधील जनतेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जात आहेत.

जातिवादाचे राजकारण करणाऱ्यांना यावेळी धडा शिकवण्याचे आवाहन करत, “राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मायबाप जनतेच्या घरातून आलेल्या, गरीबाची जाणीव असलेल्या आणि शेतकऱ्याच्या वेदना समजणाऱ्या हरिदास शेलारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राहुल कुमार ताठे, उबेद देशमुख, एकबाल देशमुख, जफर पठाण अतीक शेख व कार्यकर्ते उपस्थित होते

👉 जनतेतून आलेला उमेदवार, जनतेसाठी झटणारा नेता – अंभई गटाचा आवाज ठरू शकतो का हरिदास शेलार? हे ठरवणार आहेत मतदार!