शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’; चटणी-भाकर खाऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी!
‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला; दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ८ :- एकीकडे दिवाळीचा उत्साह आणि दुसरीकडे दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, या विरोधाभासी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी चटणी-भाकर खाऊन सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
‘देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, सणासुदीच्या काळातही अनेक शेतकरी कुटुंबांवर संकटाचे सावट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत द्या!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची योग्य भरपाई करावी, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी ठोस आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
या आंदोलनात अमितभाऊ भुईगळ, सभापती नगरसेविका करुणा जाधव, तय्यब जफर, महेश निनाळे, योगेश बन, रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, सतीश गायकवाड, मिलिंद बोर्डे, पंकज बनसोडे, शांताराम हिवराळे, बाबासाहेब दुशिंग, संदीप जाधव, सचिन शिंदे, वंदना नरवडे, पल्लवी बनसोडे, अंजन साळवे, प्रवीण हिवाळे, शाहीर मेघानंद जाधव, सोमनाथ निकाळजे, बनेखा पठाण, सखाराम शिनगारे, भावी गवई, प्रवीण जाधव, अशोक खिल्लारे, रविरत्न पारखे, राजन कीर्तने, सतीश शिंदे, उमेश सरदार, इकबाल एम.एच., मुंजा तुपसमुद्रे, भीमराज बोर्डे, सुभाष वानखेडे, राहुल जाधव, महेंद्र चाबुकस्वार, बबलूभाई बागवान, अरुण घोडके, अक्षय देहाडे, संदीप पगारे, कारभारी पवार, शिवाजी सोनवने, जया गजभिये, नागेश जाधव, शेषराव निकाळजे, पंकज गायकवाड, खुशालराव बनसोडे, प्रकाश दाभाडे, आनंद शेजुळ, भगवान खिल्लारे, राहुल वेलदोडे, दामोदर दाभाडे, भास्करराव खंडागळे, कैलास काळे, एम.एन. धंदर, वानखडे सर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित