शहरात मोठी राजकीय उलथापालथ!राष्ट्रवादी (शरद पवार) व युवासेनाला धक्का—शेकडो विद्यार्थी-युवकांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश

शहरात मोठी राजकीय उलथापालथ!राष्ट्रवादी (शरद पवार) व युवासेनाला धक्का—शेकडो विद्यार्थी-युवकांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश
शहरात मोठी राजकीय उलथापालथ!राष्ट्रवादी (शरद पवार) व युवासेनाला धक्का—शेकडो विद्यार्थी-युवकांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ :- शहरातील युवक राजकारणात मोठी भूकंपसदृश घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट) आणि युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही संघटनांना जबर धक्का देत शेकडो विद्यार्थी व युवा पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक 6 रोजी भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम विधानसभा शहराध्यक्ष सुमित पवार, तालुकाध्यक्ष आदित्य घोडके, उपशहरप्रमुख गौरव जाटवे, पूर्व विधानसभा शहराध्यक्ष प्रसाद कोकाटे, तसेच अनिरुद्ध ढवळे, आर्यन काटकर, निरंजन खैरनार, आदित्य महालदार, ऋषिकेश वंजारे, ओंकार कुटे, राहुल गोसावी, आशिष वाघ यांच्यासह विविध विभागांचे उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी पक्षावरील असंतोष व्यक्त करीत सामूहिक राजीनामे दिले.

या सर्व युवकांनी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत अधिकृतरीत्या BJP प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन कराड, उज्वला दहिफळे, भाजयुमो अध्यक्ष राहुल दांडगे, विद्यार्थी विभाग अध्यक्ष शिवराज शिंदे, शंतनु शुक्ला उपस्थित होते.

मान्यवरांनी नव्या सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करत—

“युवकशक्तीच विकासाची गती. BJP युवकांना संधी आणि सक्षम नेतृत्व देईल”— असे आवाहन केले.

**प्रवेश घेणाऱ्या युवकांची भूमिका —

“छत्रपती संभाजीनगरमधील प्रगती, दिशा आणि भविष्य फक्त BJPकडे.”**

युवकांनी स्पष्टपणे सांगितले की— स्थानिक नेतृत्व सक्षम नसल्याने, युवकांना संधी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. BJPच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घडामोडीचा परिणाम

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व युवासेनाला विद्यार्थी आघाडीतील मोठा गळतीचा सामना करावा लागणार असून, छत्रपती संभाजीनगर शहरात युवकांचा कल वेगाने BJPकडे वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 महाराष्ट्र वाणी – तुमच्या शहरातील प्रत्येक हलचल, अचूक आणि वेगवान!