"विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार!"

"विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार!"
"विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

नागपूर दि २ ऑगस्ट :– शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आज जागतिक बुद्धीबळ स्पर्धेतील विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फूके, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, बुद्धिबळपटू आणि नागपूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी दिव्या देशमुखच्या बुद्धिबळ क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिला ‘महाराष्ट्राची शान’ म्हणून गौरवले. दिव्या देशमुखने आपल्या भाषणात मिळालेल्या सन्मानाबद्दल आभार मानले आणि अधिक मोठ्या यशासाठी मेहनत सुरूच राहील, असे सांगितले.

"महाराष्ट्राच्या बुद्धिबळ इतिहासात आजची संध्याकाळ सुवर्णाक्षरांनी कोरली गेली!"