राज्यभर शिक्षकांचा संताप उसळला! 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद – जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मोर्चा

शिक्षक–शिक्षकेत्तर संघटना एकत्र येत आंदोलनाचा बिगुल.

राज्यभर शिक्षकांचा संताप उसळला! 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद – जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मोर्चा
राज्यभर शिक्षकांचा संताप उसळला! 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद – जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मोर्चा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीने 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

TET अनिवार्यतेसंदर्भातील निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होणारा विलंब, निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अग्रगण्य शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

प्रमुख मागण्या

1️⃣ TET निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी

2️⃣ TET निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू असलेली कार्यवाही थांबवावी

3️⃣ म.ना.से. नियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी

4️⃣ शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी

5️⃣ शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची सुधारित वेतन प्रगती योजना लागू करावी

6️⃣ संचमान्यता संबंधी 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा

7️⃣ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी

8️⃣ शिक्षकांवरील अशैक्षणिक व ऑनलाइन बोजा तात्काळ कमी करावा

9️⃣ विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता द्यावी

🔟 वस्तीशाळेतील शिक्षकांना नियुक्ती तारखेपासून सर्व लाभ लागू करावेत

1️⃣1️⃣ आश्रमशाळांमधील कंत्राटी शिक्षक भरती धोरण रद्द करावे

1️⃣2️⃣ कमी पटाच्या शाळा सुरू ठेवाव्यात

आंदोलनाची दिशा

👉 5 डिसेंबर – जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

👉 सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर भव्य मोर्चे

👉 मागण्या प्रलंबित ठेवल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलन

👉 त्यानंतर मुंबईत मोठे ‘धरने आंदोलन’

संघटनांचे नेतृत्व पुढे

या आंदोलनाला विविध संघटनांचे प्रमुख –

विजय साळकर, एम. के. देशमुख, भाई चंद्रकांत चव्हाण, नितीन नवले, रंजीत राठोड, राजेश भुसारी, संतोष ताठे, दीपक पवार, गोविंद उगले, अमोल एरंडे, भीमराव मुंडे, सचिन वाघ, अनिल दाने, गणेश पवार, सुभाष महेर, देविदास सांगळे, मनोज खुटे, अर्शीक ढमढेरे, राजेंद्र जाधव, नितीन पवार, प्रवीण वाघमोडे, दीपक शिंदे, राजेश देशमुख, कैलास गायकवाड, महेश लब्डे, प्रा. देवमाद वानखेडे, प्राचार्य अवधारुस, राजेंद्र बाविस्कर यांच्यासह अनेक जिल्हा–राज्य स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शिक्षकांचे सरकारला स्पष्ट आवाहन

"आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास संघर्ष तीव्र करण्यात येईल. शिक्षकांसाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील."

“शिक्षकांचा लढा वाढला तर शिक्षणखात्याची परीक्षा कठीण ठरणार – निर्णय सरकारचाच!”