“मुर्डेश्वरच्या पवित्र भूमीतून शिवसेनेचा रणशिंगनाद! सिल्लोड तालुक्यात विजयाचा बिगुल; अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक प्रचार शुभारंभ”
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि २४ :- तालुक्यातील श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान, केळगाव येथून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या विजयाचा रणशिंग फुंकण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, साधुसंतांच्या आशीर्वादाने शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य आणि ऐतिहासिक शुभारंभ संपन्न झाला.
श्रीक्षेत्र मुर्डेश्वरच्या पवित्र भूमीत महारुद्राभिषेक, विधिवत पूजन व प्रचार नारळ वाढवून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. धर्म, विकास आणि जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या लढ्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, “सिल्लोड तालुक्याच्या विकासाची खरी ताकद शिवसेनाच आहे” असे ठणकावून सांगितले. त्यांच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.
या सभेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचंड उपस्थिती आणि जनतेच्या जोशपूर्ण सहभागाने एकच संदेश स्पष्ट झाला — या निवडणुकीत शिवसेनेचा विजय अटळ आहे!
या ऐतिहासिक प्रचार शुभारंभास महंत 1008 दयानंद महाराज (शेलगाव), श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश महंत ओंकारगिरी महाराज, महंत श्री 1008 सदाशिव महाराज शास्त्री, महंत नामदेव महाराज (वाकी), कृष्णगिरी महाराज (कायगाव), विश्वनाथगिरी महाराज, कृष्णगिरी महाराज (आमसरी) यांच्यासह अनेक साधुसंतांनी उपस्थित राहून उमेदवारांना विजयाचा आशीर्वाद दिला.
तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती पाहता सिल्लोड तालुक्यात शिवसेनेची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुर्डेश्वरच्या आशीर्वादासह सुरू झालेली ही लढाई सिल्लोडच्या विकासाला नवी दिशा देणार, यात शंका नाही!