मनपाच्या पार्किंग धोरणाविरोधात चंदू नवपुते यांच्या नेतृत्वाखाली मनसे आंदोलनाच्या तयारीत

मनपाच्या पार्किंग धोरणाविरोधात चंदू नवपुते यांच्या नेतृत्वाखाली मनसे आंदोलनाच्या तयारीत

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१० :-   

 महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. शहरात वाहनतळाची सुविधा न देता मनपाकडून थेट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ (सोमवार) पासून बेमुदत आमरण उपोषण व 'भीक मागो' आंदोलन छेडण्यात येणार आहे.

हे आंदोलन दुपारी ११ वाजता मनपा आयुक्त मुख्य कार्यालयासमोर सुरू करण्यात येईल, अशी माहिती मनसेचे मध्य विधानसभा विभाग अध्यक्ष चंदू नवपुते यांनी दिली. याबाबतचे निवेदन दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.

नवपुते यांनी म्हटले आहे की,

 "महानगरपालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र शहरात योग्य ती वाहनतळाची व्यवस्था न करता ही कारवाई अन्यायकारक आहे. प्रथम वाहनतळ उभारावेत आणि मगच कारवाई करावी."

या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने प्रशासनावर दबाव टाकण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मनपाच्या पार्किंग धोरणाविरोधात चंदू नवपुते यांच्या नेतृत्वाखाली मनसे आंदोलनाच्या तयारीत