भाजप सरकारकडून राहुल गांधींना अटक; छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचा निषेध आंदोलन!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :– लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगाला जबाब विचारण्यासाठी भेट दिली असता, भाजप सरकारने त्यांना जाणीवपूर्वक अटक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शाहागंज येथील गांधी पुतळा येथे रस्ता रोको आणि जोरदार निदर्शन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोग व भाजप सरकारविरोधात प्रखर घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी राहुल गांधींची अटक ही लोकशाहीवरचा प्रहार असल्याचे सांगत, तातडीने त्यांची सुटका करण्याची मागणी केली.
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ भैया यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारवर आरोप करताना सांगितले की, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अशा दबावाच्या कारवायांना काँग्रेस कार्यकर्ते कधीही घाबरणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र वाणी – लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज!