बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी शेख युसूफ भैय्या; आमेर अब्दुल सलीम यांच्या हस्ते सत्कार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी शेख युसूफ भैय्या यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम यांनी शेख युसूफ भैय्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी काँग्रेस पक्षातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे सचिव नासेर नजीर खान, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार आणि सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेख युसूफ भैय्या यांच्यावर सोपविण्यात आलेल्या या नव्या जबाबदारीमुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला अधिक बळकटी मिळेल, तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीबद्दल शेख युसूफ भैय्या यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित