बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा! आंदोलनाने नागपूर ठप्प – उद्या रेल्वे बंदची चेतावणी!

बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा! आंदोलनाने नागपूर ठप्प – उद्या रेल्वे बंदची चेतावणी!
बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा! आंदोलनाने नागपूर ठप्प – उद्या रेल्वे बंदची चेतावणी!

महाराष्ट्र वाणी न्युज 

नागपूर दि २८ :- महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या मागण्यांकडे राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेने आज नागपूरमध्ये सरकार विरोधात प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलनकर्त्यांनी नागपूर शहर अक्षरशः ठप्प केले.

बच्चू कडू यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जमाफी, पीकविमा, कापूस-तुतीचा हमीभाव, दिव्यांगांना न्याय, कष्टकरी वर्गासाठी सन्मान योजना अशा मागण्यांसाठी निवेदनं, मार्गदर्शक बैठकांद्वारे सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारने या मागण्यांकडे मुद्दामहून 'सपेशल कानाडोळा' केल्याचा आरोप त्यांनी भाषणात केला.

📢 बच्चू कडूंचा इशारा – "बंद करू महाराष्ट्रच नाही तर भारतही!"

आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले:

> “हा लढा आता काही मोजक्या लोकांचा उरला नाही – हा महाराष्ट्राच्या अन्यायग्रस्त जनतेचा लढा आहे. राज्य सरकार बहिरं झालंय, म्हणून आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत. जर आमच्या मागण्या तत्काळ मान्य झाल्या नाहीत तर उद्या दुपारी १२ वाजता रेल्वे बंद करून 'भारत बंद' करण्याचा निर्णय घेतला जाईल."

नागपूरमध्ये झालेल्या आजच्या महास्फोटक आंदोलनात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागातून शेतकरी मोठ्या संख्येने जमले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर महाराष्ट्रात इतके मोठे जनआंदोलन प्रथमच दिसून आलं असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागली आहे.

 प्रशासन सतर्क – चर्चेला निमंत्रण की दडपशाही?

मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते नागपूरमध्ये दाखल होत असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढू लागल्याने सरकार आंदोलनाला थांबवण्यासाठी मागण्यांवर चर्चा करण्याचा पर्याय विचारात घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र प्रहार संघटनेने "निवेदन नाही – निर्णय हवा!" असा स्पष्ट इशारा दिला आहे.

✊ जनता, कार्यकर्ते एकदिलाने आंदोलनात

शेतकरी व कष्टकरी बांधवांनी हातात फलक घेत –

"आम्हाला हक्क हवा, दान नको!"

"कर्जमाफी द्या, शेत वाचवा!"

"सरकार जागं झालं नाही तर महाराष्ट्र बंद!"

असे घोषणाबाजी करत आंदोलनाची तीव्रता वाढवली.

👉 हा फक्त आंदोलन नाही – महाराष्ट्राच्या आत्मसम्मानाची लढाई वेळ दाखवेल, सरकार झुकतं की झुकवतं!