"फेकून द्याल म्हणता? मग लक्षात ठेवा, आम्हीही गुंडगिरी करूच!" – उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

"फेकून द्याल म्हणता? मग लक्षात ठेवा, आम्हीही गुंडगिरी करूच!" – उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा
"फेकून द्याल म्हणता? मग लक्षात ठेवा, आम्हीही गुंडगिरी करूच!" – उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई(प्रतिनिधी) दि ५ जुलै:- हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात उभारलेला आवाज अखेर यशस्वी ठरल्याने मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. वरळीतील 'डोम' मैदानावर पार पडलेल्या या मेळाव्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र मंचावर दिसले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून भाजपवर जोरदार टीका केली आणि मराठी अस्मितेचा झंझावात पुन्हा उभा केला.

"आम्ही एकत्र आलोय, आता हे नातं टिकवायचंय"

उद्धव ठाकरे म्हणाले, "राज ठाकरे यांनी भाषणात मांडलेले मुद्दे अत्यंत मर्मस्पर्शी होते. मात्र आज भाषणापेक्षा आमचं एकत्र येणं हेच खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. आम्ही फक्त हातमिळवणी नाही केली, तर मनामनांची दूरता संपवली. आता कोणत्याही 'बुवा महाराजांनी' काहीही केले तरी आम्ही ठाम आहोत."

"भाजपाची अफवांची फॅक्टरी, आम्ही ते बंद करणार!"

ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं, "भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. आम्ही दोघांनीही त्यांच्या फेकून देण्याच्या राजकारणाचा अनुभव घेतलाय. आता मात्र आम्ही दोघं मिळून त्यांनाच बाजूला फेकणार आहोत!"

फडणवीसांना थेट इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस म्हणतात, की भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. पण जर आंदोलन करताना न्याय मागितल्यावरही ते गुंडगिरीचं लेबल लावत असतील, तर मग हो, आम्ही गुंडच! आणि जर न्याय मिळवण्यासाठी 'गुंडगिरी' करावी लागणार असेल, तर ती आम्ही करूच!"

राज ठाकरेंचं सुद्धा स्पष्ट संकेत

राज ठाकरे यांनीही भाषणातून सांगितलं, "सरकारने निर्णय मागे घेतला याचा आनंद आहे, पण अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे. मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी, हीच इच्छा आणि हीच बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं."

 “ही लढाई मराठीसाठी होती, आता ही एकजूट महाराष्ट्रासाठी टिकवणं ही खरी गरज!”