पीरबाबा यात्रेनिमित्त सासुरवाड्यात रंगला जंगी कुस्त्यांचा आखाडा; आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड/ अंभई (प्रतिनिधी) दि १६ :- सिल्लोड तालुक्यातील सासुरवाडा येथील पीरवाडी परिसरात पीरबाबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेला आमदार अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट देत पैलवान आणि कुस्तीप्रेमींशी संवाद साधला.
ग्रामीण भागात आजही कुस्तीची परंपरा मोठ्या उत्साहाने जपली जात असून, स्थानिक पैलवानांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा आखाड्यांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने आयोजकांकडे ११ हजार रुपयांचे बक्षीस सुपूर्द करण्यात आले.
आखाड्यातील पैलवानांच्या उत्साहाला दाद देत आमदार अब्दुल सत्तार यांनी कुस्तीप्रेमींशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कुस्तीची परंपरा पुढे नेण्यासाठी ग्रामीण स्तरावरील अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब रहाटे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, माजी नगरसेवक अशोक सूर्यवंशी, कल्याणराव डवणे, विष्णू काळे, गणेश भोटकर, कृष्णा भोटकर, गोविंद काळे, राजाराम भोटकर, विष्णू सपकाळ, मनोज भोटकर, विजय भोटकर यांच्यासह ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
पीरबाबा यात्रेनिमित्त आयोजित या कुस्ती आखाड्यामुळे परिसरातील पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.