पक्षप्रवेशानंतर ‘साहेबखा पठाण’ थेट अजीत पवारांच्या भेटीला; मनपा- जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- नारेगाव येथील समाजसेवक साहेबखा पठाण यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार गट) मध्ये प्रवेश करून राजकीय क्षेत्रात नवीन पाऊल टाकले आहे. एक आठवड्यापूर्वी झालेल्या या पक्षप्रवेशानंतर, काल उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची मुंबई येथे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ताहेर खाटीक यांनी साहेबखा पठाण यांची थेट अजीत पवारांशी भेट घडवून आणली.
या भेटीत येणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, तसेच जनतेच्या समस्या व त्यावर उपाययोजना यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. साहेबखा पठाण यांनी नारेगाव परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्याची गरज यावर भर दिला.
अजीत पवारांनीही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुण, कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्वाला बळ देण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी शहरातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
महाराष्ट्र वाणी – लोकांच्या मनातील बातमी