"नगरपालिकांतील रस्त्यांचे मोजमाप होणार! अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा धडक आदेश" 🏗️

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ जुलै :
तालुका वासीयांसाठी ही बातमी धक्का देणारीच आहे! जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांचे संयुक्त मोजणी करून सीमांकन करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या जागांवर गोरगरिबांची झोपडी असो किंवा राजकीय वरदहस्त असलेले बांधकाम – कोणालाही गाफील राहता येणार नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपालिका प्रशासन शाखेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विविध नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधान आवास योजना (शहरी) 2.0, घनकचरा व्यवस्थापन, अनुकंपा भरती, शहर सौंदर्यीकरण आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक नगरपरिषदेने भूअभिलेख आणि नगररचना विभागाच्या सहकार्याने रस्त्यांची मोजणी सुरू करावी. अतिक्रमणाच्या आड येणाऱ्या रस्त्यांना मोकळे करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तात्काळ पार पाडावी.
विशेष म्हणजे, नाशिकच्या कुंभमेळ्यानिमित्त घृष्णेश्वर मंदिराकडे पर्यटकांची मोठी वर्दळ होण्याची शक्यता असून, वेरुळ परिसरात रस्ते मोकळे ठेवण्यासाठी तातडीने मोजणी करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे अन्य महत्त्वाचे निर्देश:
झिरो पेंडसीचा अवलंब करावा
जनहिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत
'विकसित महाराष्ट्र २०४७' सर्व्हेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा
तक्रार निवारण दिवस निश्चित करावा
ई-ऑफिस प्रणालीला गती द्यावी
प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी
तालुक्यांतील नगरपालिकांसाठी ही बैठक म्हणजे 'सावध रहा, अतिक्रमण हटवा' असा स्पष्ट इशारा ठरली आहे.
वाचा, समजून घ्या आणि सजग रहा – कारण आता प्रत्येक फुट रस्त्याचा हिशोब लागणार
आणखी ताज्या बातम्यांसाठी वाचा – महाराष्ट्र वाणी!