‘ड्रॅव्ही’ अॅपचे लोकार्पण – नागरिकांना मिळणार एका क्लिकवर ड्रायव्हर!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ३ ऑगस्ट :- नागरिकांना आता कोणत्याही कार्यक्रमासाठी, प्रवासासाठी किंवा तत्काळ गरजेसाठी ड्रायव्हर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. कारण ‘ड्रॅव्ही’ (DRVVY) या नावाचं एक नवीन मोबाईल अॅप आता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झालं आहे. या अॅपच्या माध्यमातून अवघ्या एका क्लिकवर, एका मिनिटात ड्रायव्हर बुक करता येणार आहे.
या उपयुक्त अॅपचे लोकार्पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले. मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी अॅपचा वापर कसा करता येतो, याची माहिती घेतली आणि अॅपची कार्यप्रणाली समजून घेतली.
"ड्रॅव्ही अॅपमुळे नागरिकांचा वेळ, ऊर्जा आणि पैसा वाचेल," असे मत आमदार जैस्वाल यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “अनेकदा गरजेच्या वेळी ड्रायव्हर मिळत नाही, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. अशा वेळी हे अॅप खूप उपयोगी ठरणार आहे.”
अॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये हे गोष्टी अंतर्भूत आहेत:
एक मिनिटात ड्रायव्हर बुकिंग
शहरातील उपलब्ध ड्रायव्हर्सची यादी
अचूक लोकेशनवर ड्रायव्हर पाठवण्याची सुविधा
वापरकर्ता अनुकूल इंटरफेस
ड्रॅव्ही अॅपचे उद्दिष्ट नागरिकांना वेळेवर आणि विश्वासार्ह ड्रायव्हर सेवा उपलब्ध करून देणे हे असून, यामध्ये स्थानिक ड्रायव्हर्सना रोजगाराच्या नव्या संधी देखील प्राप्त होणार आहेत. हे अॅप Android व iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, नागरिकांनी ते डाउनलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने गरज आणि सेवा यांच्यातला दुवा अधिकच सुलभ होत आहे – ड्रॅव्ही हे त्याचं एक यशस्वी उदाहरण ठरू शकतं!
अजून अपडेट्ससाठी वाचा – महाराष्ट्र वाणी!