डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी संतापाची लाट; युवक काँग्रेसकडून मेणबत्ती निदर्शने
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी उपपोलीस निरीक्षकाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचारास कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये हे स्पष्टपणे लिहिल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी युवक काँग्रेसकडून प्रखर आंदोलन सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलीम यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट येथे मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी "डॉ. संपदांना न्याय मिळालाच पाहिजे", "अत्याचाऱ्यांना फाशी द्या", "महिला सुरक्षेची हमी द्या" अशा घोषणा देण्यात आल्या. दोषींना तातडीने अटक करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला उपस्थित प्रमुख मान्यवर
या मेणबत्ती आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले. त्यामध्ये प्रमुखतः –
अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष इब्राहीम पठाण
प्रदेश सचिव अॅड. सय्यद अक्रम
अखिल भारतीय राष्ट्रीय अनुसूचित जाती विभाग समन्वयक डॉ. पवन डोंगरे
शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा दिपाली मिसाळ
इंटक शहराध्यक्ष शेख अथर
शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सागर नागरे
जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वास औताडे
मोईन कुरेशी, मुजफ्फर खान, इद्रीस नवाब, गौरव जैस्वाल, अब्दुल्ला शकील, डॉ. शादाब शेख, एहतेशाम शेख, इरफान इब्राहीम पठाण, शेख फैज, सुफीयान पठाण, शिरीष चव्हाण, मजाज खान, उसामा नासेर खान, इम्रान खान, आकेफ रझवी यांची विशेष उपस्थिती होती.
युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
1. गृहमंत्री पदावर फुल-टाईम मंत्री नेमावा – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याची जबाबदारी तत्काळ सोडावी.
2. आरोपी PSI ला कडक शिक्षा – प्रकरणाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला तातडीने शिक्षा द्यावी.
3. **महिला सुरक्षेसाठी ठोस कायदे आणि अंमलबजावणी