जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४.६० लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित! उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने EKYC पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४.६० लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित! उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने EKYC पूर्ण करण्याचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :– जिल्‍हयामध्ये माहे एप्रिल,२०२५ ते माहे सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये जिल्हयात अतिवृष्टी व पुरपरीस्थीती निर्माण होवून शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याअनुषंगाने माहे एप्रील,२०२५ ते सप्टेबंर २०२५ या कालावधीत झालेल्या शेती पिक नुकसानीच्या अनुषंगाने वेळोवेळी बाधित शेतकरी यांचे कृषी विभाग व महसूल विभाग यांचेमार्फत संयुक्त पंचनामे करुन बाधित शेतकरी यांच्या याद्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्हयामध्ये वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने झालेल्या शेती पिक नुकसानीबाबत मा.विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत शासनास अहवाल सादर करुन निधी मागणी करण्यात आलेली आहे. शासनास सादर करण्यात आलेल्या निधी मागणीच्या अनुषंगाने झालेल्या शेती पिक नुकसानीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी महाराष्‍ट्र शासनाने २० ऑक्टोबर, २०२५ व २९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निधी मंजुर केलेला आहे. 

जिल्हयातील बाधित शेतकरी यांना वाटपासाठी निधी मंजूर झाल्यानंतर लगेच सर्व संबंधीत तहसीलदार यांचेमार्फत तालुकानिहाय बाधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाईन पोर्टवर अपलोड करण्यात आलेल्या आहे. जिल्हयातील बाधित शेतकरी यांच्या ऑनलाईन पोर्टलवर याद्या अपलोड केल्यानंतर शेतक-यांचा अग्रीस्टेक/ फॉर्मर आयडी काढलेला आहे, त्या बाधित शेतकरी यांना तात्काळ नुकसानीबाबतचे अनुदान त्यांचे बँक खात्यामध्ये सरळ जमा करण्यात आलेले आहे.           

  तसेच शासनाने दिंनाक ४ नोव्हेबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार खरडून गेलेल्या जमीनीसाठी रक्‍कम रुपये ६७०.६० लक्ष इतका निधी मंजुर केलेला आहे. तसेच जिल्‍हयातील शेतकरी यांना खरीप २०२५ या कालावधीत अतिवृष्‍टी व पूर परिस्‍थतीमुळे बाधित झालेल्‍या शेतक-यांना रब्बी हंगामाकरीता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरीता प्रति हेक्‍टर रक्‍कम रुपये १० हजार (३ हेक्‍टरच्‍या मर्यादेत) निधी उपलब्‍ध करुन देवून मंजूर केलेला आहे.  

 शासनाने नैसर्गिक आपत्‍तीच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील शेतीपिकाचे नूकसान झाल्‍यामुळे जे शेतकरी बाधित झालेले आहे अशा शेतक-यांना अनुदान वाटप करण्‍यासाठी सर्व तहसीलदार यांचे स्‍तरावरुन ऑनलाईन पोर्टवर याद्या अपलोड करण्‍यात आलेल्‍या आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्‍हयातील ० ते २ हेक्‍टर पर्यंत नुकसान झालेले एकूण शेतकरी संख्‍या ६४४६४९ व २ ते ३ हेक्‍टर पर्यंत नुकसान झालेले एकूण शेतकरी संख्‍या ४११३९ अशी असून त्‍यापैकी ५०७७८० इतक्‍या बाधित शेतकरी यांच्‍या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्‍यात आलेल्‍या आहे. ज्‍या शेतक-यांचा अग्रीस्टेक/ फॉर्मर आयडी काढलेला आहे अशा एकूण ४६०८४० एवढया शेतक-याना त्‍यांचा सरळ बॅंक खात्‍यात अनुदानाची रक्‍कम जमा करण्‍यात आलेली आहे. उर्वरीत ४६९४० एवढया शेतकरी यांचे अग्रीस्टेक / फॉर्मर आयडी काढलेले नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या खात्‍यात अनुदानाची रक्‍कम जमा झालेली नाही. तसेच ज्या शेतक-यांचे अद्यापपर्यंत ॲग्रीस्टॅक / फॉर्मर आयडी काढलेले नाही त्यांनी त्यांचे तातडीने फॉर्मर आयडी काढून घ्यावे.

ज्या शेतक-याचे अग्रीस्टेक / फॉर्मर आयडी काढलेले नाही अश्या शेतक-यानी EKYC करणेबाबतची प्रक्रिया पुर्ण केल्‍यास त्‍यांच्‍या बॅंक खात्‍यामध्‍ये त्‍यांचे अनुदान जमा होणार आहे. करीता मा.जिल्‍हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी असे आवाहन केले आहे की, ज्‍या शेतक-यांचे EKYC झालेले नाही अशा शेतक-यांनी त्यांच्या जवळ असलेल्या सीएससी सेंटवर जाउुन त्यांनी त्यांचे तात्‍काळ EKYC करुन घ्‍यावे. जेणे करुन जिल्हयातील ज्या बाधित शेतकरी यांना अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही अशा सर्व बाधीत शेतक-यांना त्यांच्या बॅक खात्यात अनुदान जमा होणेस विलंब होणार नाही व त्यांना तातडीने अनुदान प्राप्त होणार आहे.