जावीद शेख यांचा इशारा : रोशनगेट–कटकटगेट रस्त्यावरचे धोकादायक खांब तातडीने हटवा, अन्यथा आंदोलन उभारू!

जावीद शेख यांचा इशारा : रोशनगेट–कटकटगेट रस्त्यावरचे धोकादायक खांब तातडीने हटवा, अन्यथा आंदोलन उभारू!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- रोशनगेट ते कटकटगेट या नव्या सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले विजेचे खांब नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.

या गंभीर विषयावर आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष जावीद महेमूद शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित केला आहे. “रस्ता बनवताना खांब हलवले गेले नाहीत, हे नागरिकांच्या सुरक्षेशी थट्टा आहे. जर खांब तातडीने हलवले नाहीत, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा शेख यांनी दिला.

स्थानिक नागरिकांतही संतापाची लाट असून, “एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होईल का?” असा सवाल ते विचारत आहेत.