एकता सोसायटीच्या शाळांचा दहावी-बारावी निकालात जलवा; विद्यार्थ्यांच्या यशाने संस्थेचा मान उंचावला!

एकता सोसायटीच्या शाळांचा दहावी-बारावी निकालात जलवा; विद्यार्थ्यांच्या यशाने संस्थेचा मान उंचावला!
एकता सोसायटीच्या शाळांचा दहावी-बारावी निकालात जलवा; विद्यार्थ्यांच्या यशाने संस्थेचा मान उंचावला!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ :- एकता कल्चरल अँड एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी यंदाच्या दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शानदार निकालाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.

संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहेत –

• अब्दुल शकूर देशमुख उर्दू हायस्कूल, अनवा ता. भोकरदन – ९३ टक्के

• हाजी बशीर देशमुख मेमोरियल उर्दू हायस्कूल, लासगाव ता. पाचोरा – ८८ टक्के

• राशिदा बेगम देशमुख उर्दू हायस्कूल, मिसरवाडी, छत्रपती संभाजीनगर – ८७ टक्के

• मिलेनियम इंग्लिश हायस्कूल, मिसरवाडी, छत्रपती संभाजीनगर – ७७ टक्के

• हाजी लालमिया देशमुख उर्दू हायस्कूल, उत्तरान ता. एरंडोल – ७६ टक्के

• एकता ज्युनियर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स – तब्बल ९९.९ टक्के निकाल

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नसीम आरा देशमुख, उपाध्यक्ष जिशान देशमुख, सचिव अमान देशमुख, डॉ. अमरीन देशमुख आणि डॉ. हाफिज देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे मेहनत घेणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांचेही कौतुक करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अब्दुल मुकिम देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी दुआ दिल्या. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“विद्यार्थ्यांच्या यशाने एकता सोसायटीचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.”